बॅक टू द रुट्स पुस्तक केले सादर
दाक्षिणात्य चित्रपटांनंतर बॉलिवूडमध्ये स्वतःच्या सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाने आता स्वतःचे आणखी एक कौशल्य जगासमोर आणले आहे. तमन्ना एक उत्तम कलाकार आहेच पण आता ती लेखिका देखील झाली आहे. तमन्नाने अलिकडेच स्वतःचे पहिले पुस्तक ‘बॅक टू द रुट्स’ सादर केले आहे. या पुस्तकाद्वारे तिने साहित्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
तमन्ना ‘बॅक टू द रुट्स’ पुस्तकाद्वारे प्राचीन आरोग्याच्या रहस्यांना समोर आणणार आहे. या पुस्तकात प्राचीन चिकित्सा पद्धतीचा तपशीलही देण्यात आला आहे. तमन्नाचे पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
भारत तंदुरुस्त जीवनावर शतकांपेक्षा जुन्या ज्ञानाने भरलेले एक पुस्तकालय आहे. आम्ही तंदुरुस्त राहण्याच्या स्वतःच्या पारंपरिक पद्धतींवर पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. बॅक टू दर रुट्सचे सर्व अध्याय रहस्यांनी भरलेले आहेत, त्यांनी या देशातील कित्येक पिढय़ांची सेवा केली असल्याचे तिने म्हटले आहे.
ल्यूक कॉटिन्होसोबत प्राचीन भारतीय ज्ञानाच्या प्रवासाचा आनंद घेतल्याचे तिने सांगितले आहे. तमन्नासोबत या पुस्तकाचे सहाय्यक लेखक म्हणून सेलिब्रिटी लाइफस्टाइल प्रशिक्षक ल्यूक कॉटिन्हो यांनी काम केले आहे.