सातारा / प्रतिनिधी :
छत्रपती संभाजीराजे या मालिकेतील राणू अक्का फेम अभिनेत्री अश्विनी महागंडे या सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाचे पात्र साकारत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील प्रदीपकुमार महागंडे यांचे निधन झाले. त्या दु:खातून स्वतःला सावरत महागंडे यांनी त्यांच्या चाहत्यांना शेतकरी कन्या असल्याचे स्वतःच फेसबुकवरून सांगत सध्या शेतीच्या कामात रमले आहे, असे सांगितले.
त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट #शेतकऱ्याची_लेक जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात. त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईंमुंग काढणी. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात टाकेल तिथे व येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहीजे. हीच नानांची प्रेरणा व शिकवण.
#आम्ही_शेतकरी #जबाबदारी #लागवडी #पेरणी #आठवणी #नाना #आधवड, अशी त्यांनी पोस्ट केली असून, अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.