ऑनलाईन टीम / पुणे :
अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला पुणे जिह्यातील मावळमध्ये अपघात झाला आहे. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे, सुदैवाने कारमधील सर्वजण सुखरुप असल्याचे किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे.
किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार सके ना कोई,” असे त्यांनी म्हटलं आहे.
किशोरी शहाणे एका कार्यक्रमासाठी जात असताना मावळमध्ये एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिल्याचे सांगण्यात येते.