सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागातील दत्तक मुलींचा विवाह 9 रोज पडणार पार
प्रतिनिधी / सांगली
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांनी आपल्या चेरीटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून 2019 साली सांगली कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या पूरग्रस्त भागातील एक हजार मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यांच्या नावे प्रत्येकी 50 हजार रुपये ठेवण्यात आले होते. या मुलींपैकी काही मुलींचा लग्न सोहळा तसंच उर्वरित मुलींच्या ठेव पावत्यांचं आणि पासबुक वाटप 9 सप्टेंबर रोजी दीपलक्ष्मी मंगल कार्यालय, सांगली कवठेपिरान रोड कसबे डिग्रज येथे सकाळी अकरा वाजता होणार असल्याचे अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
त्या म्हणाल्या, हा कार्यक्रम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. दरम्यान स्थानिक नाट्य कलाकारांच्यासह या क्षेत्रातील कामगारांच्यावर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.याकडे शासनाने लक्ष घालावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही दिपाली भोसले-सय्यद यांनी सांगितले.