अनेक दिवसांपासून होती बेपत्ता
‘जनरल हॉस्पिटल’ आणि ‘अमेरिकन हाउसवाइफ’ या प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही शोंमधून झळकलेली अभिनेत्री लिंजी पर्लमन लॉस एंजिलिसमध्ये मृतावस्थेत आढळून आली आहे. लिंजी काही दिवसांपासून बेपत्ता होती. लिंजी गायब झाल्यावर पोलिसांनी स्थानिक लोकांकडून तिला शोधण्यासाठी मदत मागितली होती.
लिंजी 43 वर्षांची होती आणि मागील रविवारपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह शुक्रवारी सकाळी मिळाला आहे. लॉस एंजिलिसच्या एका नागरिकाच्या घराजवळ तिचा मृतदेह आढळला. तिचा मृत्यू आणि बेपत्ता होण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याप्रकरणी सध्या तपास करत आहेत.
लिंजीच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती वॅन्स स्मिथने इन्स्टाग्रामवर स्वतःच्या भावना व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांना या दुःखाच्या घडीत खासगीत्वाचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले आहे. लिंजी ही मूळची शिकागोची रहिवासी होती. लॉस एंजिलिसमध्ये येण्यापूर्वी तिने रंगभूमीवर उल्लेखनीय काम केले होते. तिने ‘द पर्ज’चे टीव्ही व्हर्जन आणि ‘शिकागो जस्टिस’मध्ये देखील भूमिका साकारली होती.