आपल्या सर्वांनाच माहित आहे की कलाकारांना त्यांच्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. कधी डाएटिंग करून स्लीम ट्रीम व्हावं लागतं तर कधी भरपूर ताव मारून जाडजूड व्हावं लागतं. त्यामुळे कलाकारांनी सिनेमासाठी वाढवलेल्या वजनाच्या किंवा कमी केलेल्या वजनाच्या चर्चा नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या ही चर्चा सुरू आहे ती ज्युनिअर बिग बी अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनची. आगामी ‘बॉब बिस्वास’या सिनेमासाठी अभिषेकने चक्क 12 किलो वजन वाढवलं आहे, यासाठी त्याने चटपटीत अशा स्ट्रीटफूडला पसंती दिली आहे. एरव्ही खरं तर कलाकार स्ट्रीटफूडपासून चार हात लांबच असतात, पण ‘बॉब बिस्वास’ सिनेमातील भूमिकेत दिसणारा अभिषेक पडदय़ावर गोबरागोबरा दाखवायचा असल्याने दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी अभिषेकला वजन वाढवण्याचा टास्क दिला. मग काय विचारता, अभिषेकनेही बराच घाम गाळला. खास जिमट्रेनरच्या मदतीने त्याने व्यायाम करायला सुरूवात केली. व्यायामासोबतच अभिषेकने अजून एक ट्रिक वापरली आणि ती म्हणजे स्ट्रीटफूड. भरपूर मैदा, चीज असलेले चटपटीत जंकफूड मनसोक्त खाऊन अभिषेक चांगलाच जाडजूड झाला. वजन वाढवण्यासोबतच अभिषेकने या सिनेमासाठी खास बंगाली भाषाही शिकून घेतली आहे. दस्तूरखुद्द सुजॉय घोष यांनीच अभिषेकला सेटवर बंगाली भाषेचे धडे दिले आहेत.
Previous Articleशेअर बाजारात दुसरा दिवसही घसरणीचाच
Next Article नवीन वाहतूक दंडातून ऍटो रिक्षांना वगळा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.