वारंगल : येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झालेल्या 60 व्या राष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या खुल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत रेल्वेचे धावपटू अभिषेक पॉल आणि पारूल चौधरी यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 5000 मी. धावण्यांच्या शर्यतीत पहिले स्थान मिळविले.
पुरूषांच्या 5000 मी. शर्यतीत रेल्वेच्या अभिषेक पॉलने 14 मिनिटे 16.35 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान मिळविले. धर्मेंदरने 14 मिनिटे 17.20 सेकंदाचा अवधी घेत दुसरे तर कार्तिककुमारने 14 मिनिटे 20.98 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या 5000 मी. शर्यतीत रेल्वेच्या पारूल चौधरीने 15 मिनिटे 59.69 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण, महाराष्ट्राच्या कोमल जगदाळेने 16 मिनिटे 01.43 सेकंदाचा अवधी घेत रौप्य आणि महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने 16 मिनिटे 19.18 सेकंदाचा अवधीत घेत कांस्यपदक पटकाविले.