वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन (अमेरिका )
येथे सुरू असलेल्या अमेरिकन ट्रक आणि फिल्ड आऊटडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियन्सशीप स्पर्धेत अमेरिकेची विद्यमान ऑलिम्पिक विजेती महिला धावपटू सिडनी मॅक्लॉलीनने महिलांच्या 400 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत नवा विश्वविक्रम नोंदविताना यापूर्वीचा स्वतःचाच विक्रम मागे टाकला.
शनिवारी झालेल्या महिलांच्या 400 मी. अडथळय़ाच्या शर्यतीत सिडनीने 51.41 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम नोंदविताना यापूर्वीचा म्हणजे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतःच नोंदविलेला 51.46 सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढला. सिडनी आता पुढील महिन्यात होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे.