सावंतवाडी/प्रतिनिधी-
विद्यार्थ्यांची अभ्यासातील गुणवत्ता तपासणे व विदयार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करणे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा हा उत्तम पर्याय आहे या परीक्षेतील विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अशा सराव परीक्षा होणे आवश्यक आहे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व गोडकर कुटुंबियांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे केले
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडीतर्फे संघटनेचे माजी मार्गदर्शक गुरुवर्य स्व दशरथ गोडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गोडकर कुटुंबीय पुरस्कृत सावंतवाडी तालुका स्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उदघाट्न प्रसंगी त्या बोलत होते यावेळी आरपीडी हायस्कूल मुख्यध्यापक जगदीश धोंड, स्व दशरथ.. गोडकर यांचे ज्येष्ठ बंधू व आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक यशवंत गोडकर, प्रा. दिलीप गोडकर, रामदास गोडकर, अक्षता गोडकर, श्रुती पेडणेकर, केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे, वैज, शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस म ल देसाई, अमर पाटील, सावंतवाडी तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. गोडकर म्हणाले, स्व दशरथ गोडकर यांना स्पर्धा परीक्षेची व विध्यार्थी घडविण्याची आवड होती त्यामुळे त्यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यासाठी ही स्पर्धा पुरस्कृत केली असल्याचे सांगितलं म. ल. देसाई यांनी आभार मानले या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तालुक्यातील सर्व केंद्रावर ही स्पर्धा झाली स्पर्धेसाठी सावंतवाडी पंचायत समिती कडून चांगले सहकार्य लाभले. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 649… तर आठवी साठी 368 विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली.