श्राईन बोर्डाच्या बैठकीत निर्णय
जम्मू / वृत्तसंस्था
यंदाची वार्षिक अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार आहे. जम्मूचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत शनिवारी यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. मागील वषी कोरोना संसर्गामुळे वार्षिक अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. पण, यावषी 28 जूनपासून ही यात्रा सुरू होणार असल्याचे बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. 28 जूनपासून रक्षाबंधनापर्यंत यात्रेचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. या यात्रेचे नियोजन श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्यावतीने केले जाते. या यात्रेसाठी देश-विदेशातून यात्रेकरू सहभागी होत असतात.
….