श्रीनगर
2022 मधील अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने केली आहे. या दरम्यान एका दिवसात 20 हजार लोकांची नोंदणी केली जाणार आहे. जो बालटाल आणि चंदनवाडी या दोन्ही मार्गांनी अमरनाथ गुफास्थळी जाण्याची सुविधा उपलब्ध असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भाविकांसाठीचा मार्ग सुसज्ज करण्यासाठी बर्फ हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील आठवडय़ापासून सदर काम सुरू होणार आहे. यात्रेची तयारी सुरू झाली असून बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची वाहने आरएफआयडीद्वारे ट्रक केली जाणार आहेत.