ऑनलाईन टीम / अमरावती :
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येतही भर पडत आहे. त्यातच अमरावतीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात दोन एप्रिल ला या रुग्णांचा मृत्यू झाला असून आज सकाळी त्याचा कोरोना चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला निमोनिया झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र रुग्णाला श्वसनक्रिये चा त्रास होऊ लागल्याने त्याला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
मात्र 2 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले. यामुळे अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे सध्या अमरावतीमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी सुरू आहे.