नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसमधून बाहेर पडलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी भारतीय जनता पक्षाचे पंजाब प्रभारी गजेंदसिंग शेखावत यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे. अमरिंदरसिंग यांनी नवा पक्ष स्थापन केला असून भाजपशी जागावाटप समझोता करण्याची इच्छा दर्शविली आहे. याच संदर्भात ही चर्चा होती, असे नंतर स्पष्ट करण्यात आले. त्यांच्या पक्षाचे नाव पंजाब लोक काँगेस असे आहे. पंजाबमध्ये येत्या मार्च मध्ये विमानसभा निवडणूक होत असून यावेळी या राज्यात चौरंगी लढत अपेक्षित आहे.