अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग ताब्यात
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमध्ये राजकीय संघर्ष वाढत चालला आहे. राज्य सरकारवर भ्रष्टाचार आणि घोटाळय़ांचा आरोप करत शिरोमणी अकाली दलाने मंगळवारी निदर्शने केली आहेत. अकाली दलाच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंर सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शन केली आहेत. निदर्शनादरम्यान पोलिसांकडून पाण्याचा मारा करण्यात आला. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना ताब्यात घेण्यात आले.
कोविड-19 लसीकरणात राज्यात घोटाळा झाला आहे, फतेह किट, अनुसूचित जातीसाठीच्या शिष्यवृत्तीत घोटाळा करण्यात आला आहे. शेतकऱयांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे सुखबीर यांनी म्हटले आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीकरता अकाली दलाने बसपसोबत आघाडी केली आहे.