वार्ताहर / तवंदी :
अमलझरी (ता. निपाणी) येथील बिरदेव यात्रा मोठय़ा उत्साहात झाली. तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी 6 वाजता वालंग जमणे, रात्री पालखी मिरवणूक झाली. गुरुवारी सकाळी 7 वाजता बिरदेव देवास अभिषेक व पूजा विधी सावंता शिंगाडे पुजारी यांच्या हस्ते झाला. 10 वाजता दूध साखर जमविण्यात आले. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात धनगरी ढोलांचा आवाज दुमदुमत होता. यात्रेत भंडाऱयाची उधळण करण्यात आली. यात्रेनिमित्त स्लो सायकल स्पर्धा, स्लो मोटरसायकल, रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आल्या. यात्रेत मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्याबरोबरच विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. शुक्रवार 31 रोजी रात्री 9 वाजता नटराज सोंगी भजनी मंडळ कुर्ली यांचा कार्यक्रम होणार आहे.
यात्रेसाठी श्रीमंत दादाराजे देसाई-सरकार यांच्यासह धनगर समाजाचे अध्यक्ष सत्तू गावडे, सिद्राम पुजारी, म्हाळाप्पा बन्ने, हाल्लाप्पा गावडे, रामा वास्कर, विठ्ठल गौंडन्नावर, सोमराय यमगर, मारुती गावडे, भैराप्पा गावडे, म्हाळाप्पा गौडन्नावर आदी प्रमुखांची उपस्थिती होती. यात्रेसाठी संत कनकदास युवक मंडळाचे मंजू वास्कर, ओमकार पुजारी, सोमशेखर पुजारी, म्हाळाप्पा गौडन्नावर, मंजू पुजारी, तसेच बिरदेव यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.