ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाचा उपचार घेत असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पण अजूनही त्यांच्या दोन टेस्ट होणार आहेत. त्यानंतर लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील 12 दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन या पहिल्यांदा होम क्वारंटाइन होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्यात देखील कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमिताभ बच्चन यांची 22 जुलै ला करण्यात आलेल्या टेस्ट चे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अभिषेक बच्चन यांचे देखील सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे लवकरच दोघांनाही डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. तर आराध्या आणि ऐश्वर्या यांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी आहेत.