ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना सोमवारी सकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत.
डॉक्टरांनी सांगितले की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, तसेच त्यांच्या टेस्ट नेगेटिव्ह आल्यामुळे काहीही घाबरण्याचे कारण नाही, असेही डॉक्टरांनी यावेळी सांगितले.