विधानसभा निवडणुकीसाठी नेत्यांना मार्गदर्शन करणार
वृत्तसंस्था/ वाराणसी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उत्तर प्रदेश दौरा सुरू झाला आहे. शुक्रवारी ते वाराणासी येथे पोहोचले. उत्तर प्रदेशात महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणूक पुढील वर्षाच्या मार्चमध्ये होत असून या निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहा येथे आले आहेत. ते उत्तरप्रदेशच्या विविध भागांमध्ये प्रभावी असणाऱया भाजपच्या 700 नेत्यांना प्रचारासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.
वाराणसी विमानतळावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंदीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी धमेंद्र प्रदान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि पक्षाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग यांनी अमित शहा यांचे स्वागत केले. त्यानंतरशहा यांनी उत्तर प्रदेशातील सर्व 403 मतदार संघांमधील भाजपच्या प्रभारी नेत्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणूक मोठय़ा बहुमताने जिंकण्याच्या दृष्टीने आतापासूनच जनसंपर्क वाढवा अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी या मतदारसंघ प्रभारींना केल्याचे स्पष्ट करण्यात आले. शनिवारी अमित शहा राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.