पडवे येथील मेडिकल कॉलेजचे त्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आघाडीचे नेते अमित शहा हे 6 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात दाखल व्हायचे होते. त्यांच्या हस्ते पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र शनिवारी शेतकरी आंदोलकांनी ‘चक्का जाम’ आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे शहा यांचा शनिवारी होणारा सिंधुदुर्ग दौरा आता 7 फेब्रुबारी रोजी होणार आहे. ही माहिती लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्यावतीने देण्यात आली.
पडवे येथे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे. या मेडिकल कॉलेजला शासन मान्यता मिळाली आहे. या कॉलेजचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम 6 फेब्रुवारी रोजी होणार होता. त्यासाठी सर्व जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली होती.
मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेची काळजीपूर्वक रचना गेले दोन दिवस केली जात होती. प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी कोणतीच कमतरता राहू नये, यासाठी स्वतः राणे लक्ष देऊन आहेत. शहा हे केवळ दोन तासांसाठी, तेही कोणत्याही जाहीर कार्यक्रमासाठी येत नसले, तरी जिल्हा भाजपमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाभर अमित शहा तसेच त्यांच्यासोबत जिल्हय़ात येणाऱया भाजप नेत्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. शहा यांचा शासकीय दौराही जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. मात्र दुपारनंतर शहा हे शनिवारऐवजी रविवारी जिल्हय़ात दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्या होणार उद्घाटन
लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन 6 फेब्रुवारी रोजी होणार होते. मात्र दिल्ली येथे सध्या शेतकरी आंदोलन सुरू असून, शनिवारी या शेतकरी आंदोलकांनी देशभर चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हा उद्घाटनाचा कार्यक्रम आता 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. rn}}(e,r),l=r;l