भोपाळ : हरियाणाचा धावपटू अमीत खत्रीने बुधवारी येथील टीटीनगर स्टेडियममध्ये झालेल्या 18 व्या राष्ट्रीय फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत 20 वर्षांखालील वयोगटातील झालेल्या 10,000 मी. चालण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
17 वर्षीय अमीत खत्रीने 10,000 मी. चालण्याची शर्यत जिंकताना 40 मिनिटे, 40.97 सेकंदाचा अवधी घेतला. 2018 साली रांची येथे झालेल्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 10,000 मी. चालण्याच्या शर्यतीत संजयकुमारने नोंदविलेला 42 मिनिटे, 09.44 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम त्याने मागे टाकला.