रिना या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्टनिस्ट अमीर खानने किरण रावसोबत दुसऱयांदा लग्नगाठ बांधली. काही महिन्यांपूर्वी किरणसोबतही वेगळे होण्याचा निर्णय अमीरने घेतला. अमीर आणि किरण यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रूपेरी दुनियेत झाली. इतकंच नव्हे तर जरी आम्ही आता नवरा बायको नसलो तरी मित्र राहू आणि भविष्यात काही प्रोजेक्ट एकत्र करू, असेही ही जोडी म्हणाली होती. असो, अमीर पुढे किरणसोबत सिनेमा करेल की नाही हे तर अजून स्पष्ट नाही. पण अमीर पुन्हा तिसऱयांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. अमीरने तिसऱयांदा निकाह करण्यासाठी त्याची भूतकाळातील सहकलाकार निवडल्याचेही बोललं जात आहे. खरं तर किरणसोबत घटस्फोट झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी दंगलगर्ल फातिमा शेखसोबत अमीरला स्पॉट केलं होते, तेव्हाच त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याचा धूर निघत होता. पण अमीरला मी गुरू मानते आणि फातिमा माझी चांगली मैत्रीण आहे, असं म्हणत दोघांनीही सावध पवित्रा घेतला होता. पण आता मात्र अमीर आणि फातिमा लवकरच ‘कबूल है’ असं काझींच्या साक्षीने म्हणणार असल्याचे ऐकायला येतंय. अर्थातच अजूनही खान आणि शेख कुटुंबीयांकडून लग्नाची बोलणी झाली आहेत की नाही, हे गुलदस्त्यात आहे. जर ही बातमी खरी असेल तर अमीरच्या आयुष्यात तिसऱयांदा जोडीदार येईल आणि त्याचे आयुष्य अधिक परफेक्ट होईल हे निश्चित.
Previous Articleआजचे भविष्य मंगळवार दि. 23 नोव्हेंबर 2021
Next Article परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.