तरुणभारत ऑनलाइन टीम
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर मागील काही दिवसांपासून फारच चर्चेत आहे.चंद्रमुखी या चित्रपटामुळे अमृता सोशल मीडियावर झळकत होती. पण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याने अमृताचे तुळजापूरला जायचे राहून गेले होते.म्हणून तिने अलीकडेच तुळजापूरला जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देवदर्शनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती तुळजाभवानीचे दर्शन घेतलं आहे.तसेच तिने व्हिडीओ खाली कॅप्सन देखील दिल आहे. “लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे …. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. चंद्रमुखी release झाला ….. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं …. आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही”, असं तिने म्हंटल आहे.या व्हिडिओत अमृता सोबत तिची आई देखील आहे.