मुंबई प्रतिनिधी
सध्या नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत .दोघांनीही परस्परांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केले आहेत.नवाब मलिकांच्या जावयाकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा ही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
दरम्यान नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिकने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटीसीमध्ये, येत्या 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असे बजावण्यात आले आहे. मानहानीच्या खटल्यासोबतच फौजदारी कारवाईचाही इशारा देखील नोटिसीतून देण्यात आला आहे.