क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए धारवाड झोन फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत गुण तालिकेत क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक अ संघ धारवाड व एसडीएम क्रिकेट ऍकॅडमी अ धारवाड संघांनी 16 गुणांसह ए ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. ब गटात अमृत पोतदार सीसीआयने 20 गुणासह प्रथम पहिले स्थान तर बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ 16 गुणासह दुसऱया स्थानावर आहे.
केएससीए ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियमवर केएससीए फर्स्ट डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सर्व साखळी सामने पूर्ण झाले आहेत. अ गटात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक अ धारवाड संघाने पाच सामन्यामध्ये चार विजय, एक पराजयासह 16 गुण, एसडीएम क्रिकेट अकादमी अ धारवाड संघाने 5 सामन्यांत 4 विजय, 1 पराजयासह 16 गुण मिळवले.
ब गटात अमृत पोतदार सीसीआय बेळगाव संघाने 5 सामने, 5 विजय एकूण गुण 20, बेळगाव स्पोर्ट्स कलब अ -5 सामने, 4 विजय, 1 पराजय एकुण गुण 16 घेतले.
गुणतालिकेनुसार अ गटात क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक अ धारवाड व एसडीएम क्रिकेट अकादमी अ धारवाड संघानी 16 गुणासह उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. ब गटात अमृत पोतदार सीसीआय बेळगाव संघाने 20 गुण व बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाने 16 गुणासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना शनिवारी 3 रोजी क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक अ धारवाड वि. बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ बेळगाव यांच्यात केएससीए ऑटोनगर बेळगाव येथे खेळविण्यात येणार आहे. दुसरा उपांत्य सामना एसडीएम क्रिकेट अकादमी धारवाड वि अमृत पोतदार सीसीआय बेळगाव यांच्यात केएससीए हुबळी मैदानावर सामना शनिवार दि. 3 रोजी खेळविण्यात येणार आहे. अंतिम सामना रविवारी खेळविण्यात येणार आहे.