अभिनेत्रीच्या कंपनीसोबत 405 कोटींचा करार
नेटफ्लिक्स आणि अमेझॉन ओटीटी प्लॅटफॉर्मने अनुष्का शर्माची कंपनी क्लीन स्लेट फिल्समसोबत 54 दशलक्ष डॉलर्सची (405 कोटी रुपये) भागीदारी केली आहे. कंपनीने हे पाऊल भारतीय बाजारातील वाढती स्पर्धा पाहता उचलले आहे. दोन्ही ओटीटी कंपन्यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि चित्रपट तसेच वेबसीरिजच्या निर्मितीसाठी ही भागीदारी केली आहे.
कंपनीचे संस्थापक आणि अनुष्काचा भाऊ करनेश शर्मानुसार पुढील 18 महिन्यांमध्ये अमेझॉन आणि नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 8 वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. क्लीन स्लेट फिल्म्सने 2015 मध्ये एनएच 10 चित्रपट तयार केला होता.
ओटीटी बाजारात स्पर्धा वाढण्याचा अर्थ या कंपन्यांना स्वतःचे बजेट वाढवावे लागणार आहे. आमच्या प्रॉडक्शन हाउसच्या सहकार्याने निर्मित वेबसीरिज पाताल लोकने अमेझॉन प्राइमवर चांगला प्रतिसाद मिळविला होता. नेटफ्लिक्सवर आम्ही चकदा एक्स्प्रेस सादर करणार आहोत. असेच माई ही थ्रिलर सीरिज आणि काला हा ड्रामापट आणणार आहोत असे करनेशने सांगितले.