वेब सीरिजमध्ये संजय कपूर मुख्य भूमिकेत
ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘द लास्ट आवर’ ही सुपरनॅचरल क्राइम सीरिज 14 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये संजय कपूर, शहाना गोस्वामी आणि राइमा सेन मुख्य भूमिकेत आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडिओची भारतातील ही पहिली सुपरनॅचरल सीरिज आहे.
हिमालयीन क्षेत्राची पार्श्वभूमी दर्शविण्यात आलेल्या एका मांत्रिकाभोवती याची पटकथा गुंफण्यात आली होती. हा मांत्रिक बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षकाला एका क्रूर खुन्याला पकडण्यास मदत करत असल्याचे दाखविण्यात ाले आहे. द लास्ट आवरमध्ये संजय, शहाना आणि राइमासह कर्मा ताकपा, शायली क्रिशेन, रॉबिन तमांग आणि मंदाकिनी गोस्वामी मुख्य व्यक्तिरेखांमध्ये दिसून येणार आहेत. या सीरिजची पटकथा अमित कुमार आणि अनुपमा मिंज यांनी लिहिली आहे. सीरिजचा टीझर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे.