‘टारझन’ जो लारासह 7 जणांनी गमावला जीव
वृत्तसंस्था / नॅशविले
टारझनची भूमिका साकारणारा अमेरिकेतील अभिनेता जो लारा आणि त्याची पत्नी ग्वेन शम्ब्लिन लारा समवेत विमानातून प्रवास करणाऱया 7 जणांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. नॅशविले शहरानजीक एका सरोवरात ही दुर्घटना घडली आहे.
रदरफोर्ड काउ&टी फायर अँड रेस्क्यूने एक छोटे चार्टर्ड विमान शनिवारी सकाळी 10 वाजता दुर्घटनाग्रस्त झाले होते, अशी माहिती दिली आहे. या विमानाने स्मिर्नाच्या रदरफोर्ड विमानतळावरून फ्लोरिडाच्या पाम बीचसाठी उड्डाण केले होते. प्राइस्ट लेकमध्ये विमान कोसळले आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. रविवारी रात्री विमानाचे अवशेष मिळाले असून मानवी मृतदेहाचे तुकडेही सापडले आहेत. सोमवारीही शोधमोहीम राबविण्यात आली आहे.
1989 मध्ये प्रदर्शित टारझन इन मॅनहॅटन या चित्रपटात जो लारा यांनी टारझनची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी 1996-97 दरम्यान टारझन द एपिक ऍडव्हेंचर या टीव्ही सीरिजमध्ये काम केले होते. 2018 मध्ये त्यांनी ग्वेन शम्ब्लिन यांच्याशी विवाह केला होता. शम्ब्लिन या ख्रिस्तियन वेट लूज ग्रुपच्या नेत्या होत्या. त्यांनी या ग्रुपची स्थापना 1986 मध्ये केली होती. 1999 दरम्यान टेनेसीच्या बेंटवूडमध्ये रेमनेंट फेलोशिप चर्चची त्यांनी स्थापना केली होती.