ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकन एअर फोर्सचे एफ-15 सी इगल विमान आज सकाळी 9.40 च्या सुमारास समुद्रात कोसळले.
यूएस एअर फोर्सचे कॅप्टन मिरांडा टी सिमॉन्स यांनी याबाबतची माहिती दिली.
अमेरिकन एअर फोर्सच्या 48 फायटर विंगच्या एफ -15 सी ईगल फाइटर प्लेनने ट्रेनिंग मिशनसाठी सफोकमधील मिल्डनहॉल जवळच्या लेकनहीथ एअरबेसवरुन उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान उत्तर समुद्रात कोसळले. पूर्व यॉर्क शायरच्या किनारपट्टीपासून १३७ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. विमानाच्या अपघातामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच वैमानिकांचाही शोध अद्याप लागला नाही. एअर फोर्सकडून अपघातग्रस्त विमानाचा शोध घेण्यात येत आहे.