न्यूयॉर्क :
अमेरिकन डेव्हिस चषक संघाचा माजी कर्णधार पॅट्रीक मॅकेन्रो याला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. 53 वर्षीय मॅकेन्रोला गेल्या काही दिवसापासून बरे वाटत नव्हते पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी मॅकेन्रोला खोकला, सर्दी आणि किरकोळ ताप अशा तक्रारी सुरू झाल्या. न्यूयॉर्कमधील एका खासगी रूग्णालयात मॅकेन्रोची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. मॅकेन्रोच्या प्रकृतीमध्ये झपाटय़ाने सुधारणा होत असून येत्या काही दिवसामध्ये त्याला घरी पाठविले जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले. दोन आठवडय़ापेक्षा अधिक त्याला क्वारंटाईन कक्षात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मॅकेन्रोने 1995 साली सिडनीत एकमेव एटीपी टूरवरील स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविले होते. तसेच 2007 साली डेव्हिस चषक जिंकणाऱया अमेरिकन संघाचे नेतृत्व त्याने केले होते. 1989 साली मॅकेन्रोने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीचे जेतेपद अमेरिकेच्या ग्रॅबसमवेत पटकाविले होते.