वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान होणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून रशियाची 35 वर्षीय महिला टेनिसपटू स्वेतलाना कुझेनत्सोव्हाने कोरोनाच्या भीतीमुळे माघार घेतली असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
अमेरिकेमध्ये पुन्हा गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याचे दिसत आहे. कुझेनत्सोव्हाने कोरोनाच्या भीतीमुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचा धोका पत्करला नाही. 2004 साली कुझेनत्सोव्हाने दोन ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली होती. महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत कुझेनत्सोव्हा 32 स्थानावर आहे. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून झेकची स्ट्रायकोव्हा, चीनची झीई यांनी यापूर्वीच माघार घेतल्याचे अमेरिकन टेनिस संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.