ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकन नौदलाचे MH-60S सीहॉक हेलिकॉप्टर मंगळवारी सॅन डिएगोच्या किनाऱयावर कोसळले. या हेलिकॉप्टरमधील क्रू मेंबरसह पायलट बेपत्ता असून, नौदलाकडून त्यांचा सुरू आहे. आज अमेरिकन नौदलाने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे.
नौदलाचे MH-60S सीहॉक हेलिकॉप्टर युद्धादरम्यान मदतकार्य पोहचविण्यासाठी अथवा बचावकार्यासाठी वापरले जाते. या हेलिकॉप्टरने मंगळवारी नियमित उड्डाण केले हाते. सॅन डिएगोहून उड्डाण घेऊन समुद्रावर फेऱ्या मारत असताना अचानक हे हेलिकॉप्टर 60 मैल दूरवर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती क्रू मेंबर्स होते, याची माहिती अद्याप समोर आली नसून, नौदलाकडून पायलट आणि क्रू मेंबरच्या शोधात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.