जुलियस, पाटापोशियन यांनी केलेल्या संशोधनाचा गौरव
स्टॉकहोम / वृत्तसंस्था
यावर्षीचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक डेव्हिड जुलियस आणि आर्डेम पाटापोशियन या अमेरिकन शास्त्रज्ञांना मिळणार आहे. शरीराचे तापमान आणि स्पर्श यांच्या रिसेप्टरचे संशोधन केल्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, असे नोबेल निवड समितीने स्पष्ट केले.
शरीराचे तापमान आणि स्पर्श या दोन बाबींचा विविध शरीरवैज्ञानिक प्रक्रियांमध्ये (फिजियॉलॉजिकल प्रोसेसेस) महत्त्वाचा भाग असतो. या ज्ञानाचा उपयोग अनेक रोगांवरचे उपचार विकसीत करण्यासाठी होतो. असहय़ कळांवरील उपचार शोधण्यातही हे संशोधन उपयोगी पडत आहे. या दोन संशोधकांनी विविध वेदनाशामक औषधे निर्माण करणाऱया प्रक्रियाही शोधल्या आहेत. त्यामुळे त्याचे महत्त्व लक्षात घेऊन यंदा हे परितोषिक या दोन शास्त्रज्ञांना देण्यात येत आहे.
सुवर्णपदक, प्रशस्तीपत्र आणि एक कोटी स्विडीश क्रोनर्स (11.40 लाख डॉलर्स) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पारितोषिकाचे पैसे दोन्ही विजेत्यांना विभागून देण्यात येणार आहेत. गेल्या वर्षीचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक यकृताला होणाऱया हेपिटायटीस सी या विकाराचा विषाणू शोधण्याच्या कार्यासाठी तसेच या विकाराची चाचणी शोधण्यासाठी तीन शास्त्रज्ञांना देण्यात आले होते.
यंदाचा नोबेल कार्यक्रम
ड भौतिक शास्त्र (फिजिक्स) पारितोषिकाची घोषणा आज मंगळवारी
ड रसायन शास्त्र (केमिस्ट्री) पारितोषिकाची घोषणा उद्या बुधवारी
ड साहित्य (लिटरेचर) साठीच्या पारितोषिकाची घोषणा गुरुवारी
ड शांती (पीस) नोबेल पुरस्काराची घोषणा होणार येत्या शुक्रवारी