50 टक्के अधिक फैलाव करणारे विषाणूचे नवे स्वरुप
अमेरिकेत कोरोनाचा अधिक फैलाव करणारा संकरावतार अस्तित्वात असू शकतो, असे व्हाइट हाउसच्या कोरोनाविषयक कृतिदलाने म्हटले आहे. कृतिदलाकडून सादर अहवालात अमेरिकन संकरावतारासंबंधी इशारा देण्यात आला आहे. हिवाळय़ादरम्यान अत्यंत वेगाने रुग्णसंख्या वाढली असून हे प्रमाण पावसाळा तसेच उन्हाळय़ाच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाचा अमेरिकन संकरावतार देशात असू शकतो, असे संक्रमणाचा दर पाहता दिसून येते. वैज्ञानिकांनी याला 50 टक्के अधिक फैलाव करणारा संकरावतार ठरविले आहे. फेस मास्क, शारीरिक अंतर आणि अधिकाधिक लसीकरणाद्वारे आम्ही यावर नियंत्रण मिळवू शकतो असे कृतिदलाने म्हटले आहे. तर अमेरिकेच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या लॉस एंजिलिस काउंटीमध्ये दिवसभरात 318 जणांचा मृत्यू ओढवला आहे.