सचिन मानेंच्या प्रयत्नांतून कोविड सेंटरवर रुग्णांसाठी मोफत औषधे
प्रतिनिधी / वाकरे
कोल्हापूर जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता सचिन माने यांच्या प्रयत्नांतून विविध देणगीदारांकडून शिवाजी विद्यापीठाच्या कोविड सेंटरवर कोरोना रुग्णांसाठी मोफत ६२ हजारांची औषधे उपलब्ध करुन देण्यात आली, त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सचिन माने सध्या शिवाजी विद्यापीठाच्या कोविड सेंटरवर कर्तव्य बजावत आहेत. सध्या कोविड सेंटरवर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. सेंटरवर आवश्यक औषधे उपलब्ध करण्याचा त्यांच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणुन त्यांचे अमेरीकास्थित मित्र स्थापत्य अभियंता धैर्यशील पाटील यांचेकडून आलेल्या मदतीतून २५ हजार रुपये किंमतीची औषधे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांचे हस्ते कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त रविकांत अडसुळ यांचेकडे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, डॉ.निलेश लांब,डॉ.अमित सातारकर यांचे उपस्थितीत शिवाजी विद्यापीठ कोव्हीड केअर सेंटर १,२,३ येथे सुपुर्द करणेत आली. यावेळी कनिष्ठ अभियंता संघटनेचे सरचिटणीस इंजिनिअर उन्मेश मुडबिद्रीकर मंडळ सचिव इंजिनिअर अभय हेर्लेकर,शाखा अभियंता किरण कांबळे, सहायक अभियंता नितीन भोजकर, अशोक एकशिंगे, सचिन माने उपस्थित होते.
तसेच जलसंपदा विभागाचे निवृत्त उपविभागीय अधिकारी विक्रम कारखानीस व शिवाजी पेठेतील आकाश नलवडे यांचेकडुन आलेली रुपये २७ हजार किंमतीची मेडिसिन, ग्लोवज, मास्क,सँनिटाय़झर रविकांत अडसुळ यांच्याकडे सुपुर्द केली. तर शिवाजी पेठेतील होतकरु मेडीकल रिप्रेझेटेटिव्ह आकाश नलवडे यांनी १० हजार रुपयांची कोव्हीडची औषधे भेट दिली व तरुण वयात सामाजिक बांधिलकी व जबाबदारी जपली.
सचिन मानेंचे दररोजचे प्रयत्न
आपल्या कोव्हीड सेंटरवर औषधाविना रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून औषधे उपलब्ध होणेसाठी सचिन माने दररोज प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.