ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने प्रत्येक देशाला ठरवून दिलेली एच-1 बी व्हिसा मर्यादा रद्द केली आहे. तसेच कौटुंबिक व्हिसा मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे ‘ग्रीन कार्ड’च्या प्रतिक्षेतील भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
अमेरिकेत नोकरीसाठी असलेले भारतीय एच-1 बी व्हिसा घेऊन अमेरिकेत राहतात. अमेरिकेत कायमच्या वास्तव्यासाठी अनेक जण ग्रीन कार्डसाठी अर्ज करतात. मात्र, अर्ज करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत असलेल्या अमेरिकेतील भारतीयांसाठीचा प्रतिक्षा कालावधी 195 वर्षांपर्यंत पोहोचला असल्याचे सिनेटर माइक ली यांनी सांगितले होते.
अमेरिकेतील सिनेटमध्ये मंजूर झालेल्या विधेयकामुळे रोजगारावर आधारित व्हिसावरील 7 टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. कुटुंबावर आधारित व्हीसाचे प्रमाणही 15 टक्के करण्यात आले आहे.