ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरातील विविध देशांना 5.5 कोटी कोरोना लसींचे वितरण करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. भारत, बांगलादेश यासारख्या आशियाई देशांना त्यामधील 1.6 कोटी लसी देण्यात येणार आहेत.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, बायडेन प्रशासनाने जगभरातील कोरोना महामारीला थोपवण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. यापूर्वी अमेरिकेने जगभरातील देशांना 2.5 कोटी लस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोमवारी बायडेन यांनी आणखी 5.5 कोटी लस वितरित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकेकडून जगभरातील देशांना एकूण 8 कोटी लस मिळणार आहेत.
या 8 कोटी लसींपैकी 75 टक्के लसी कोव्हॅक्स मोहिमेद्वारे वितरित होतील. उर्वरित 25 टक्के लसी कोरोनाने अधिक प्रभावित झालेल्या देशांना पुरविण्यात येणार आहेत.