ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडले आहेत. नुकतेच ट्रम्प प्रशासनाने यासंदर्भात WHO ला अधिकृत पत्र दिले आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना WHO समाधानकारक काम करत नसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेने WHO ला देण्यात येणारा निधी एप्रिलपासून रोखला होता. आता अमेरिकेने WHO ला अधिकृत पत्र पाठवून अमेरिकेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.
अमेरिका 6 जुलै 2021 पासून WHO ची सदस्य असणार नाही. WHO ने 1984 मध्ये ठरविलेल्या नियमांनुसार कोणतेही सदस्यत्व मागे घेतल्याच्या एक वर्षानंतर तो देश WHO मधून बाहेर पडू शकतो. अमेरिकेच्या WHO पासून विभक्त होण्याच्या निर्णयाचा इतर देशांनाही मोठा धक्का बसला आहे.