ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिका ‘मॉडर्ना’ कंपनीकडून कोरोना प्रतिबंधक लसीचे 10 कोटी अतिरिक्त डोस खरेदी करणार आहे. अमेरिकेने त्यासाठी कंपनीसोबत 1.65 बिलियन डॉलरचा करार केला आहे. अमेरिका सरकारने यापूर्वी ऑगस्ट महिन्यात मॉडर्ना कंपनीसोबत 10 कोटी डोस तयार करण्याचा करार केला होता. त्यासाठी 1.5 बिलियन अमेरिकी डॉलरचा करार केला होता.
अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार म्हणाले, मॉडर्ना पुढील महिन्यात अमेरिकन सरकारला नवीन डोसचा लॉट देणार आहे. त्यामुळे देशातील 10 कोटी जनतेला कोरोना लसीचे दोन डोस देता येतील. सहा वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी करार झाला आहे. ज्याद्वारे देशभरातील जनतेला लस देण्यात येणार आहे.
मॉडर्नाने ब्रिटन, जापन, कॅनडा, स्वित्झर्लंड, इस्त्राईल या देशांसोबत ही करार केला आहे.