न्युयॉर्क
अमेरिकेतील जो बायडेन सरकारने भारतीयांच्याबाबतीत एक महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता अमेरिकेतील एच वन बी व्हिसा असलेल्यांच्या जोडीदाराला अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी असणार आहे. स्वयंचलीत कामाचा प्रशासकीय परवाना एच वन बी व्हिसा धारकांना दिला जाणार आहे. म्हणजेच एच वन बी व्हिसा घेऊन काम करणाऱयाच्या पती किंवा पत्नीला आता अमेरिकेत नोकरी करता येणार आहे. याआधी याबाबत निर्बंध घालण्यात आले होते. पण आता सरकारने यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेत असंख्य नोकरीच्या शोधात असणाऱया किंवा नोकरी करू पाहणाऱया जोडीदारांना मोठा दिलासा दिला आहे. एच-4 व्हिसाधारक रोजगारासाठी अधिकृत कागदपत्रे सादर करून प्राधिकारणाची चाचणी देत असतात. पण त्याचा त्यांना लाभ होत नव्हता. यातून कितीतरी जणांना नोकरी गमवावी लागली होती, ज्याने अमेरिकेतील व्यवसायांनाही नुकसान झेलावं लागलं. एच-4 व्हिसा हा एच वन बी व्हिसाधारकांना दिला जातो. अमेरिकेत स्थायीक असणाऱया हजारो भारतीयांना याचा लाभ होणार असल्याचे समजते.