ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांसाठी लष्करी ड्रोन निर्यातीचे निकष अंशतः शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रराष्ट्रांना अमेरिकन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, हा यामागचा उद्देश आहे.
आतापर्यंत युद्ध किंवा संघर्षाच्या काळात लष्करी ड्रोनचा वापर केला जात नव्हता. आता त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे 1976 मधील क्षेपणास्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थाही बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या बदलामुळे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना तातडीच्या संरक्षणासाठी ड्रोन मिळू शकतील. तसेच अमेरिकेतील ड्रोन उद्योगासाठी नवी बाजारपेठही खुली होईल.
नवीन धोरणानुसार ताशी 800 किलोमीटर वेगापेक्षा कमी वेगाने उडणारी ड्रोन ‘मिसाईल टेक्नोलॉजी कंट्रोल रेजीम’च्या अंतर्गत येणार नाहीत, असेही ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर ‘ट्रम्प प्रशासनाने घातक ड्रोन निर्यात करण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय निर्यात नियंत्रण धोक्यात येणार आहे, असे निनेटर बॉब मेंडेज यांनी म्हटले आहे.