वृत्तसंस्था/ अबु धाबी
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या अबु धाबी खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम विजेती अमेरिकेची सोफिया केनिनने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना रशियाच्या पुतिनसेव्हाचा पराभव केला.
अमेरिकेच्या केनिनने रशियाच्या 13 व्या मानांकित पुतिनसेव्हाचा 3-6, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात मारिया सॅकेरीने माजी विंबल्डन आणि प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेती गार्बेनी मुगुरूझाचा 7-5, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. केनिन आणि सॅकेरी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. त्याचप्रमाणे इलिना स्विटोलिनाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना ऍलेक्सोंडोव्हाचा 6-2, 6-7 (5-7), 7-6 (8-6) असा पराभव केला. युक्रेनची स्विटोलिना आणि रशियाची कुड्रेमेटोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. सॅबेलिनेकाने जेबॉरवर 6-2, 6-4 अशी मात करत पुढील फेरी गाठली. रिबेकिनाने तिसऱया फेरीत कॅसेटकिनावर 6-3, 6-4 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.