वृत्तसंस्था/ लेक्झिंग्टन
अमेरिकेच्याजेनीफर ब्रॅडीने रविवारी येथे डब्ल्यूटीए टूरवरील आपले पहिले विजेतेपद मिळविले. हार्ड कोर्टवरील येथे झालेल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीच्या अंतिम सामन्यात ब्रॅडीने स्वीसच्या जिल टिचमनचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. या स्पर्धेत ब्रॅडीने उपांत्य सामन्यात अमेरिकेचे गॉफचे आव्हान संपुष्टात आणले होते. आता या स्पर्धेनंतर न्यूयॉर्कमध्ये सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धा चालू आठवडय़ामध्ये खेळविली जाणार आहे. यानंतर न्यूयॉर्कमध्ये 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा खेळविली जाणार आहे.