ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेने फायझर आणि मॉडर्ना लसींचे जगभरातील देशांना वाटप सुरू केले आहे. भारतालाही लस दिली जाणार आहे, पण भारतात काही कायदेशीर अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे भारताकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची अमेरिका वाट पाहत असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नाड प्राइस यांनी सांगितले.
प्राइस म्हणाले, अमेरिकेच्या लसी पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि बांगलादेशात पोहोचल्या आहेत. परंतु भारतात पोहोचणे कठीण आहे. आपत्कालीन आयातीत काही कायदेशीर अडथळे असल्याने भारतापर्यंत लस पोहोचण्यास वेळ लागत आहे. भारताने आपली परिचालन, नियामक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला आहे. भारत सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आम्ही लसी त्वरीत पाठविण्यास तयार आहोत, असेही प्राइस म्हणाले.