ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे एन-35 सी हे लढाऊ विमान सोमवारी दक्षिण चीन समुद्रात उतरत असताना कोसळले. या दुर्घटनेत सात अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत.
अमेरिकन नौदलाने यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण चीन समुद्रात उतरत असताना अमेरिकेचे एन-35 सी हे लढाऊ विमान कोसळले. या दुर्घटनेत सात अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर वैमानिकाला विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. जखमींपैकी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्राथमिक उपचारानंतर चार जवानांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विमान अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसून, त्याचा नौदलाकडून तपास सुरू आहे.