ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन अमेरिकेने भारतासाठी पाठवलेले पाच टन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज दिल्लीत दाखल होणार आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून हवेतील ऑक्सिजन रुग्णांना देता येऊ शकतो.
न्यूयॉर्कच्या कॅनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी सकाळी पाच टन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतासाठी रवाना करण्यात आले आहेत. ते आज दुपारी दिल्लीत दाखल होतील.