वृत्तसंस्था / टोकियो
कोरोना महामारीच्या भीतीमुळे अमेरिकेच्या फिल्ड आणि ट्रक ऍथलेटिक्स संघाचे जपानमध्ये आयोजित केलेले सराव शिबीर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रद्द करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱया अमेरिकेच्या फिल्ड आणि ट्रक ऍथलेटिक्स संघासाठी चिबा येथे सराव शिबीर आयोजित केले होते. चिबाच्या प्रशासनाने ऍथलीट्सच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत कोरोनाच्या भीतीमुळे सावधगिरीचा उपाय म्हणून हे शिबीर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र अमेरिकेच्या ट्रक आणि फिल्डकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही.
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला 23 जुलैपासून प्रारंभ होत आहे. कोरोना महामारी समस्येची गंभीर दखल घेत जपान शासनाने आतापासून सर्व खबरदारीचे उपाय अंमलात आणले आहेत. जपानमध्ये सध्या नव्याने कोरोना बाधित रूग्ण आढळून येत असल्याने येथील जनतेने सदर ऑलिंपिक स्पर्धा रद्द किंवा लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवडय़ात फायझर आणि जर्मनीच्या बायोटेक कंपनीतर्फेआंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला कोरोना लसी देण्याचा निर्णय घेतला हाता पण लसीकरणाचा वेग संथ असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.