ट्रक अँड फिल्ड इतिहासातील सर्वात यशस्वी महिला ऍथलिट, मेरलेन ओटेचा विक्रम मोडला
महिलांच्या 400 मीटर्स फायनलमध्ये अमेरिकेच्या ऍलिन फेलिक्सने विक्रमी 10 वे ऑलिम्पिक पदक जिंकले. या विजयश्रीसह ती ट्रक अँड फिल्ड इतिहासातील सर्वात यशस्वी महिला ऍथलिट देखील ठरली. सर्वकालीन ऑलिम्पिक पदकतालिकेत तिने मेरलेन ओटेचा विक्रम यावेळी मोडीत काढला.
बहामासच्या शॉने मिलेर-युईबोने 48.36 सेकंद वेळेत हा इव्हेंट जिंकला असला तर फेलिक्सने 49.46 सेकंद वेळेसह पदक जिंकल्याने ती अधिक चर्चेत राहिली. फेलिक्ससाठी 2015 नंतर ही सर्वात वेगवान वेळ ठरली.
ऍलिन फेलिक्स शनिवारी 4ƒ400 रिले फायनलमध्ये सहभागी होणार होती. त्यात पोडियम फिनिश केल्यास तिला अमेरिकेच्या कार्ल लुईसचा अमेरिकन विक्रम मोडण्याची संधी होती.