वाशिंग्टन/ वृत्तसंस्था
अमेरिकेचे जागतिक दर्जाचे टेनिसपटू बॉब आणि माईक ब्रायन बंधूंनी आपल्या 25 वर्षांच्या व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्राला निरोप देण्याची घोषणा केली. 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा उंबरठय़ावर असताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
1995 साली ब्रायन बंधूंनी आपल्या आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्राला ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेपासून केला होता. बॉब आणि माईक यानी टेनिस क्षेत्रामध्ये आपले अव्वल स्थान बरीच वर्षे राखत एटीपी टूरवरील विविध स्पर्धांमध्ये 119 दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली असून त्यामध्ये ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील 30 विजेतेपदांचा समावेश आहे. या जोडीने 2012 लंडन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.
ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत माईंक आणि बॉब यांनी 30 वेळा अंतिम फेरी गाठत 16 जेतेपदे, एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धांमध्ये या जोडीने 59 वेळा अंतिम फेरी गाठत 39 विजेतेपदे मिळविली आहेत. ब्रायन बंधूंनी 2006, 2007, 2009, 2010, 2011, 2013 सालात अशी एकूण सहावेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत, 2003 आणि 2013 साली पेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत, 2006, 2011, 2013 साली तीनवेळा विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत तसेच 2005, 2008, 2010, 2012 आणि 2014 साली अशी एकूण पाचवेळा अमेरिकन ग्रॅन्डस्ल्Ÿाम स्पर्धेत पुरूष दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली आहेत. 2005 ते 2006 च्या दरम्यान ब्रायन बंधूंनी सलग सातवेळा ग्रॅन्डस्ल्Ÿाम अजिंक्यपदे मिळवून हा विक्रम नेंदविला.
एटीपीच्या पुरूष दुहेरीच्या मानांकन यादीत ब्रायन बंधूंनी एकूण 438 आठवडे (दहा टेनिस हंगामात) अग्रस्थानही राखले.
2003, 2005-07, 2009-2014 या कालावधीत ब्रायन बंधू एटीपीच्या पुरूष दुहेरीच्या मानांकनात अग्रस्थानावर होते. गेल्यावर्षी एटीपी टूर टेनिस शौकीनांतर्फे ब्रायन बंधूंचा फेव्हराईट सांघिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. ब्रायन बंधूंनी हा पुरस्कार 14 वेळा मिळविला. 2015 साली ब्रायन बंधूंचा आर्थर ऍश ह्युमेनीटेरियन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. निवृत्तीचा निर्णय योग्य वेळी घेतल्याचे बॉब आणि माईक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.