ऑनलाईन टीम / बगदाद :
बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या रॉकेट हल्ल्यात इराणचा वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाला आहे.
मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱयाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी हा पश्चिम आशियात ईराणी कार्यक्रम राबवण्यारा प्रमुख रणनीतिकार मानला जातो. सीरियात आपली मुळे घट्ट करणे, तसेच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करणे हे आरोप सुलेमानी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दीर्घ काळापासून अमेरिका सुलेमानीच्या मागावर होती.
सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.