ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या संसद भवनाबाहेर एका संशयित कार चालकाने हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन पोलिसांपैकी एका पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात या कार चालकाचाही मृत्यू झाला असून, कॅपिटॉल आवारात सुरक्षेसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
कॅपिटॉल हिल पोलीस कार्यकारी प्रमुख व्नाय पिटमॅन म्हणाले, मृत कारचालकाने संसद भवनाबाहेरील सुरक्षेचे बॅरिकेट्स तोडत दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडले. यात जखमी झालेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यामधील एका जखमी पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा कोणताही दहशतवादी हल्ला नव्हता. या घटनेतील मृत हल्लेखोराचे आणि पोलिसांचे नाव अद्याप उघड करण्यात आले नाही.
हल्लेखोर कारचालकाकडे चाकू असल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचे पिटमॅन यांनी म्हटले आहे.